बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बुलडाण्यात चुकीची उपरती झाल्यावर कंत्राटदाराने वाचवले सरकारचे 35 लाख..! वाचा कसे ते…

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 5 वर्षांपूर्वी थातूरमातूर पद्धतीने केलेल्या  बुलडाणा शहरातील आयटीआय ते भराड हॉस्पिटलपर्यंतच्या रिंग रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांचा हिरमोड झाला. नागरिकांच्या वतीने पत्रकार सुधाकर अहेर यांनी आवाज उठवत गल्ली ते दिल्ली तक्रारी केल्या. त्यांना ॲड. सतीश रोठे यांचीही साथ मिळाली. त्यांनी संबंधित कार्यालयाचे 5 वर्षे उंबरठे झिजवले. अखेर उपरती झालेल्या ‘त्या’ कंत्राटदाराने स्वखर्चाने हा रस्ता टकाटक करून दिल्याने त्यांच्या 5 वर्षांच्या अविरत संघर्षाला यश मिळाले अन्‌ चकाचक रस्ता पाहून परिसरवासियांनी एकच जल्लोष केला.

2015 साली सुमारे 1 कोटी 15 लक्ष रुपये खर्चून बुलडाणा नगरपालिकेने शहरातील आयटीआय ते भराड हॉस्पिटलपर्यंतच्या रिंग रोडचे 800 मीटर डांबरीकरण, 400 मी.काँक्रीटीकरण व दुभाजकासह रस्त्याचे बांधकाम केले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एक महिन्यातच रस्त्याची दयनीय अवस्था झाली. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले अन्‌ रस्त्यावरील धुळीचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. खड्ड्यांमुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते.

या रस्त्यावर पादचाऱ्यांना चालणे व वाहनधारकांना आपली वाहने चालवनेही कठीण झाले होते. दरम्यान या रस्त्याच्या गुणवत्तेबाबतची तक्रार आझाद हिंद संघटनेच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांसह तत्कालीन मुख्यमंत्र्यांना देखील करण्यात आली. दरम्यान चौकशीनंतर कंत्राटदार व संबंधितांना आपल्या चुकीची जाणीव झाली व कंत्राटदाराने पुन्हा स्वखर्चाने या रस्त्याचे डांबरीकरणाचे व दुभाजकाच्या डागडुजीसह रंगरंगोटीचे काम करून दिल्याने तक्रारकर्त्यांच्या पाच वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. ठेकेदाराने स्वखर्चातून पुन्हा रस्ता तयार करून दिल्याने शासनाच्या सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचा खर्च देखील वाचला असल्याचे समाधान तक्रारकर्त्यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: