बुलडाणा (घाटावर)

बुलडाण्यात जलजागृती सप्ताहाचे उद्‌घाटन; 22 मार्च पर्यंत चालणार जलजागृती सप्ताह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः  जागतिक जलदिन 22 मार्चनिमित्त 16 ते 22 मार्च 2021 या कालावधीत जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे उद्‌घाटन बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांचे हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोविड-19 नियमांचे पालन करून करण्यात आले. गत्‌वर्षीच्या तुलनेत सिंचनात 10 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

अधीक्षक अभियंत्‍यांच्‍या दालनात झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्याती खडकपूर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पूर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपूजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी नितिन सुपेकर यांनी पाणीबचतीचे महत्व जनतेस पटवून देण्याचे आवाहन केले. सप्ताहा दरम्यान 17 ते 21 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करताना स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार कोविड प्रादुर्भावाच्या लागू असलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचेआवाहन अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले. जलजागृती सप्ताहात पाणीबचती विषयी जनजागृती करणे, विभागाच्या वाहनांवर पोस्‍टर्स लावणे, पाणीबचती विषयी मान्यवर वक्त्यांचे प्रबोधनपर सेमिनार आयोजित करणे, मान्यवरांच्या पाणी बचत, पाणी वापर संस्था व कालवा स्वच्छता आदी विषयावर यशोगाथा आयोजित करणे, सोशल मीडियावर पाणी बचती विषयी जनजागृती करणे अशाप्रकारे जास्तीत जास्त ONLINE स्वरुपात साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित असलेल्या पेनटाकळी पाणी वापर संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर  यांनी पाणीवापर संस्था व जलसंपदा विभाग यांच्या समन्वयाने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे महत्त्व विषद करून, पाणी ही काळाची गरज असून, पाणी बचत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. उपकार्यकारी अभियंता श्रीमती क्षितीजा गायकवाड  यांनी याप्रसंगी गृहिणींनी दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक अधीक्षक अभियंता तुषार मेतकर, शाखा अभियंता अनिल खानजोडे, सहायक अधीक्षक अभियंता अंकुश गावित,  लघुलेखक भरत राऊत,  करण उमाळे, नितीन डब्बे, शत्रुघ्न धोरण, शेख ग्यासुद्दीन आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन मनजीतसिंग राजपुत यांनी मानले. कार्यक्रमाला जलसंपदा विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: