क्राईम डायरीमुख्य बातम्या

बुलडाण्यात तलावाच्‍या भिंतीवरून उडी घेतली, जागीच मृत्‍यू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : शहरातील सम्राट अशोकनगर (वॉर्ड क्र. 1) येथील तलाव काठच्‍या भिंतीवरून उडी मारल्याने दगडांवर आपटून 40 वर्षीय पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 26 मे रोजी रात्री आठच्‍या सुमारास घडली.

दत्ता पांडुरंग पिंपळे (रा. भिलवाडा) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन मृतदेह पंचनाम्‍यासाठी जिल्हा सामान्य रुग्‍णालयात पाठवला. वृत्त लिहीपर्यंत दत्ता पिंपळे यांच्‍या उडी घेण्याचे कारण कळू शकले नाही.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: