बुलडाणा (घाटावर)

बुलडाण्यात पकडला कोब्रा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील सागवान भागातील तुळशीनगरात १३ जुलैला सायंकाळी साडेआठच्‍या सुमारास कोब्रा (नाग) जातीचा विषारी साप भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. मायाताई पदमने यांच्‍या घराजवळ आढळला. राहुल हिवाळे या सर्पमित्राने त्‍याला पकडून वनविभागाच्या मदतीने सुरक्षित जंगलात सोडले. यावेळी संजीवनी पवार, प्रमिला डुकरे, मीरा कळसकर, कांता झगरे,रामानंद कळसकर, गजानन पवार, दीपक वाघ, जयेश इंगळे, आकाश सोनुने आदींसह सर्व रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला, अशी माहिती सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष नंदिनीताई साळवे यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: