क्राईम डायरीमुख्य बातम्या

बुलडाण्यात मोबाइल चोरून घरी गेला… पोलीस मागे मागे आले…!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरातील इकबाल चौकात एकाचा मोबाइल चोरणार्‍याच्या मुसक्या अवघ्या सहा तासांत बुलडाणा शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. शेख मेहबूब शेख इस्माईल (20, रा. शेलूद, ता. चिखली) संशयिताचे नाव आहे. काल, 4 जानेवारीला रात्री 8 च्या सुमारास त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील इकबाल चौकातील एकाचा 14 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाइल काल दुपारी 2 वाजता चोरीला गेला होता. त्याची तक्रार लगेच शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. शहर पोलिसांनी सायबर क्राईम विभागाच्या मदतीने लोकेशन तपासल्यावर मोबाईल शेलूद येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी शेलूद गाठत आरोपीला मोबाईलसह ताब्यात घेत बुलडाणा शहर ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर, पो.हे.काँ. दिलीप पवार, पो.ना. पंजाब पैठणे, पो.ना. माधव इंगळे, पो.काँ. प्रशांत मोरे, पो. काँ. अमोल शेजोळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: