बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

बुलडाण्यात लवकरच कार्यान्वित होणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट! तुटवडा कमी होण्यास होणार मदत, गंभीर रुग्णांना दिलासा

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोनविरुद्धच्या लढाईत प्राणपणाने लढणाऱ्या जिल्हा मुख्यालयातील महिला रुग्णालय अर्थात कोविड रुग्णालयात लवकरच ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित होणार आहे. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार असून, गंभीर रुग्णांसाठी हा प्रकल्प प्राणरक्षक ठरणार आहे.

ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे साहित्य, उपकरणे  घेऊन आलेले वाहन आज, 21 एप्रिलला बुलडाणा नगरीत दाखल झाले. या संदर्भात विचारणा केली असता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी या संयंत्राची क्षमता 80 जम्बो सिलिंडर इतकी असल्याचे सांगितले. हवेतील प्राणवायू( ऑक्सिजन) शोषून घेऊन तो साठवून ठेवायची क्षमता या प्रकल्पात आहे. राज्य सरकारकडून हे सयंत्र मिळाले असल्याचे सांगून ते येत्या पाचेक दिवसांत कार्यान्वित होईल, असा विश्वास सीएस डॉ. तडस यांनी बोलून दाखविला. बुलडाणा पाठोपाठ कोरोनाचा  गंभीर उद्रेक असलेल्या खामगाव, मलकापूर व देऊळगावराजा येथेही लवकरच असेच ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहितीही  त्यांनी दिली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: