बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदार दुकानदारांना ठोठावला 10 हजारांचा दंड!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाविरुद्धची दुसरी लढाई खंबीरपणे लढणारे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी आज, 24 फेब्रुवारीला सर्व बडेजाव विसरून रस्त्यावर उतरत 2 दुकानदारांना प्रत्येकी 5 हजारांचा दंड ठोठावला! यामुळे शहरातील मनमानी पद्धतीने वागणाऱ्या दुकानदारांत धडकी भरली असून, दंडात्मक कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांत उत्साह संचारला आहे.

लॉकडाऊनचे पालन होत आहे की कसे हे पाहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले होते. या पाठोपाठ आज, 24 फेब्रुवारीला शहरात फेरफटका मारताना त्यांना दोन दुकाने उघडी आढळल्याने त्यांनी दुकान मालकांना प्रत्येकी 5 हजारांचा दंड ठोठावला आहे. जयस्तंभ चौकातील पार्वती ट्रेडिंग व एक झेरॉक्स दुकानदारास एस. रामामूर्ती यांनी दंडीत केले. खुद्द जिल्हाधिकारीच रस्त्यावर आल्याने अधिकारी व प्रशासन देखील गतिमान झाले आहे.
जयस्तंभ चौकातील पंजाब वाइन बारजवळ असणारे पार्वती ट्रेनिंग येथे औरंगाबाद येथून आलेल्या ट्रकमधून कलरचे डब्बे उतरविण्याचे काम सकाळी साडे अकराच्‍या दरम्यान सुरू होते. याच दरम्यान जिल्हाधिकारी त्या रस्त्यावरून जात होते. अर्धवट उघडे असलेले शटर आणि ट्रकमधून सामान उतरवताना पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी गाडी दुकानाकडे वळवत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. लॉकडाऊन चालू आहे तुम्हाला माहिती नाही का, अशी विचारणा केली ? नंतर मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना सूचित करून पाच हजार रुपये दंड केला. यानंतर बाजारलाइन भागात फेरफटका मारला असता त्या ठिकाणी सुद्धा त्यांना कापड दुकान अर्धवट उघडे दिसले. या ठिकाणी जाऊन खातरजमा करून त्यांनी दुकान मालकास देखील 5 हजार दंड केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: