क्राईम डायरीमुख्य बातम्या

बोलेरो पिकअपची एसटी बसला धडक, महिला प्रवासी जखमी, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बोलेरो पिकअप चालकाने एसटी बसला दिलेल्या धडकेत प्रवासी महिला जखमी झाली. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील खामगाव तालुक्‍यातील पिंप्राळा शिवारात काल, ३० जुलैच्‍या रात्री साडेआठच्‍या सुमारास घडली.

संध्या पुरुषोत्तम साबनकार (रा. कारंजा लाड) असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एसटी बसचालक उमेश त्र्यंबकराव जगताप (४८, रा. आर्वी, जि. वर्धा) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून बोलेरो पिकअपचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तो वाहनासह अपघात होताच फरारी आहे. वर्धाहून औरंगाबादला ही बस जात होती. पिंप्राळाजवळ बोलेरो पिकअप वाहन चालकाने त्याच्‍या ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून बसला चालकाकडील बाजूस धडक दिली. यात बसचे १५ हजार रुपयांचे नुकसानही झाले आहे. तपास सहायक फौजदार आनंदा वाघमारे करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: