क्राईम डायरीमुख्य बातम्या

बोलेरो पिकअप वाहनाने दुचाकीला मागून उडवले, मेडिकल चालक ठार!; चिखली तालुक्‍यातील घटना

उंद्री (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने ओव्‍हर करण्याच्‍या नादात मोटारसायकलस्‍वाराला उडवले. यात मोटारसायकलस्‍वार जागीच ठार झाला. ही घटना उंद्री-अमडापूर मार्गावरील लालमाती शिवारात आज, 23 फेब्रुवारीला दुपारी दीडच्‍या सुमारास घडली. गोविंदराव नसवाले (34)असे ठार झालेल्याचे नाव आहे. ते उंद्री येथील गोविंद मेडिकलचे मालक आहेत. त्‍यांना लालमाती शिवारात मागून येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने (क्रमांक एमएच 27, एक्‍स 7784) उडवले. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: