बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

ब्रेकिंग! बुलडाणा तहसीलमधील आणखी एक कर्मचारी कोरोनाग्रस्त; पॉझिटिव्हचा आकडा 20 च्या घरात

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तहसील कार्यालयात कोरोनाचा स्फोट झाला असून, आणखी 1 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने तूर्तास हा आकडा 19 वर पोहोचला आहे. मात्र एका कर्मचाऱ्यात कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने व त्याचा अहवाल लवकरच मिळणार असल्याने एकूण आकडा 20 च्या घरात पोहोचण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मोजक्या कर्मचाऱ्यांसह कार्यरत तहसीलदार रुपेश खंडारे.

यापूर्वी मार्चचा पहिला आठवडा तहसीलचे कामकाज ठप्प करणारा व तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यासह कर्मचाऱ्यांची कठोर परीक्षा घेणारा ठरला. 4 मार्चला तहसीलमधील 3 जण पॉझिटिव्ह आले. यानंतर 7 मार्चला तब्बल 15 कर्मचारी पॉझिटिव्ह झाल्याचे आढळून आले. या पाठोपाठ 8 मार्चला आणखी 1 जण बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. याशिवाय एका कर्मचाऱ्यात कोरोनाची गंभीर लक्षणे आढळली असून, त्याचा अहवाल लवकरच हाती येणार आहे. यामुळे तहसील पुन्हा हादरले आहे.

तणावपूर्ण शुकशुकाट
दरम्यान, 19 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. पब्लिकची जास्त वर्दळ असलेल्या अन्न पुरवठा कक्षाचे काम ठप्प झाले आहे. अशीच इतर विभागांची गत आहे. तहसीलदार मोजक्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामकाज करीत असल्याचे आज 9 मार्च रोजी दुपारी दिसून आले. अगदी चौकापर्यंत हाऊस फुल्ल राहणाऱ्या तहसील परिसरात शुकशुकाट व तणावपूर्ण शांतता पसरल्याचे जाणवते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: