महाराष्ट्र

भयंकर… मोबाइल हेडफोसाठी भावानेच केला बहिणीचा खून!

अकोला : तरुण पिढी एखाद्या वस्तूसाठी किती आसक्त झाली आहे आणि ती वस्तू मिळाली नाही, की ती कोणत्याही थराला जायला तयार होते. केवळ मोबाइलच्या हेडफोनसाठी एखाद्याचा खून होतो यावर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु आता या घटना प्रत्यक्षात यायला लागल्या आहेत.

अकोला इथं अशी एक धक्कादायक घटना घडली. मोबाईलच्या हेडफोनसाठी एका तरुणानं आपल्या आतेबहिणीची हत्या केली. हत्या झालेल्या तरुणीचं नाव नेहा नंदनलाल यादव असं आहे. नेहाची हत्या करणाऱ्या तिच्या आतेभावाचं नाव ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव असं आहे. बॉबी आणि नेहा या दोघांमध्ये हेडफोनवरुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला, की संतापलेल्या बॉबीने नेहाच्या गळ्यावर चाकूने वार केले. नेहरा त्यात जखमी झाली. तिची आरडाओरड ऐकून शेजारी मदतीला धावले. त्यांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं; पण उपचाराआधीच नेहाचा मृत्यू झाला. बॉबीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: