क्राईम डायरीमुख्य बातम्या

भरधाव ट्रकने टेम्पोला उडवले; 14 वर्षीय मुलगा जागीच ठार, 10 जण जखमी; अंढेरा फाट्याजवळील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ट्रकने टेम्पोला दिलेल्या धडकेत 14 वर्षीय मुलगा जागीच ठार तर 10 जण गंभीर जखमी झाले. ही घटना चिखली-देऊळगाव राजा रोडवरील अंढेरा फाट्याजवळ आज, 28 फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास घडली. मृतक आणि सर्व जखमी माळीवाडा (ता. औरंगाबाद) येथील कुंभरे कुटुंबातील आहेत. ते चिखली येथे खामगाव रोड परिसरात पाल टाकून राहत होते व मसाला विक्रीचा व्यवसाय करत होते.
लॉकडाऊन होण्याची भीती वाटल्याने कुंभरे परिवार त्यांच्या मूळगावी माळीवाडा येथे परतत होता. अंढेरा फाट्याजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या टेम्‍पोला जोरदार धडक दिली. यात टेम्‍पो उलटला. यात अविनाश अवघडराव कुंभरे (14) याचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. 7 जणांना बुलडाणा जिल्हा रुग्णालय तर 3 जणांना औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. मृतक अविनाश हा एकुलता एक होता. त्याच्या वडिलांचेही यापूर्वीच निधन झाले आहे.
जखमींची नावे ः मीना अवघडराव कुंभरे (45), निलू अवघडराव कुंभरे (56), गीता रामनाथ कुंभरे (40), राखी अजय कुंभरे (40), मैना रंगनाथ कुंभरे (70), अजय जगन्नाथ कुंभरे (45), रूपा रंगनाथ कुंभरे (45), नयना अवघड कुंभरे (16), प्रिया अजय कुंभरे (12), आर्यन अजय कुंभरे (7, सर्व रा. माळीवाडा, ता. औरंगाबाद)

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: