क्राईम डायरीमुख्य बातम्या

भरधाव ट्रक महिलेला उडवून पळाला;शिवसैनिकांनी पाठलाग करून पकडला अन्‌ फोडला; चिखली शहरातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रकने महिलेला धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. ही घटना आज, ९ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास चिखली शहरातील खामगाव चौफुली येथे घडली.

सपना अविनाश जाधव (२५, रा. राऊतवाडी, चिखली) ही महिला आज खामगाव चौफुली येथून राऊतवाडी येथे जात होती. दरम्यान जालन्‍याकडून बुलडाणाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (क्र. आरजे १४ जीएच 1398) तिला जबर धडक दिली. यात ती जबर जखमी झाली. महिलेला चिखली येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. भरधाव ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. ही माहिती शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांना मिळताच त्यांनी शिवसैनिकासह ट्रकचा पाठलाग केला. हातणी फाट्यावर ट्रक उभा करून चालक फरारी झाला. संतप्त शिवसैनिकांनी ट्रकची तोडफोड केली. पोलिसांना ही माहिती मिळताच ट्रक पोलिसांनी चिखली पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: