क्राईम डायरी

भरधाव दुचाकी झाडाला धडकून चालक गंभीर…’त्‍या’ देवदूतांमुळे वाचले प्राण!; बोथा घाटातील घटना

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव दुचाकी झाडाला धडकून चालक गंभीर तर मागे बसलेला किरकोळ जखमी झाला. ही घटना काल, 27 फेब्रुवारीला सायंकाळी 7:30 च्या सुमारास बोथा घाटातील वरवंड नाक्याजवळ घडली.

नांदुरा तालुक्यातील आलमपूर येथील बबन गौतम हातोळकर व त्यांचे सहकारी दुचाकीने खामगाववरून बुलडाण्याकडे येत असताना हा अपघात झाला. बबन हातोळकर गंभीर जखमी झाले. संध्याकाळी वेळ आणि रस्त्यावर वाहतूकही तुरळक होती. हातोळकर यांच्या सहकाऱ्याने त्यांना वरवंड नाक्यापर्यंत जखमी अवस्थेत आणले. घटनेची माहिती वरवंडचे किशोर जेउघाले यांना मिळताच त्यांनी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड यांना फोन करून ॲम्बुलन्सची मागणी केली. ॲम्बुलन्स ताबडतोब उपलब्ध झाल्यामुळे हातोळकर यांना तातडीने बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तसेच बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला सुद्धा घटनेची माहिती दिली. जखमींच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती देत बुलडाणा सामान्य रुग्णालयात येण्यास सांगितले. जखमींच्या उपचाराची तातडीने व्यवस्था केली. जखमींना उपचारार्थ भरती करण्यासाठी भास्करराव शिंगणे शाळेचे लिपिक दत्तात्रय तेजराव जेऊघाले, राजू बनकर, शुभम धनदर यांनीही सहकार्य केले. किशोर जेउघाले यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या माणुसकीच्या धर्माने जखमींचे प्राण वाचले एवढे मात्र खरे!

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: