बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मका खरेदी पुन्हा सुरू ; 30 जूनपर्यंत मुदत, 14 खरेदी केंद्रांना मान्यता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत राज्य शासनातर्फे हमी दराने मका खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. येत्या 30 जूनपर्यंत ही खरेदी सुरू राहणार आहे. तसेच मका खरेदीसाठी शासनाने 60 हजार क्विंटलचे उद्दिष्ट दिलेले आहे.

जिल्ह्यात मका खरेदीसाठी 8924 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. जिल्ह्यात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा झाली. त्यानुसार जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मका खरेदीसाठी 14 खरेदी केंद्रांना तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री समिती मर्या. बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, संग्रामपूर, शेगाव , मलकापूर, जळगाव जामोद व खानगाव, तसेच संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपूरक सहकारी संस्था मर्या चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी देऊळगाव राजा केंद्र – सिंदखेडराजा, नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा केंद्र- वाडी या केंद्रांना मान्यता दिलेली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी, बुलडाणा यांनी जिल्ह्यामध्ये या टिकाणी मका खरेदी सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील त्यांनी या संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन यावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: