क्राईम डायरी

मतदानाचे व्‍हिडिओ शुटिंग व्‍हायरल करणे भोवले!; तरोडा नाथच्‍या ‘प्रतापी’विरुद्ध गुन्‍हा दाखल

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः निवडणुकीत मतदान करतानाचे व्‍हिडिओ शूटिंग करून व्‍हायरल करणाऱ्या तरोडा नाथ (ता. खामगाव) येथील प्रताप आत्माराम धोती याच्याविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

अजय बाबुराव जावरे (55) यांनी 27 मार्च रोजी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला तक्रार केली की, 15 जानेवारी 2021 रोजी भंडारी येथे सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक निमित्ताने माझी केंद्राध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मतदान केंद्रावरील उमेदवार गजानन गोवर्धन चव्हाण यांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून प्रताप आत्माराम धोती (रा. तरोडा नाथ) याने फॉर्म भरला होता. त्याने स्वतः चे मतदान करतानाचे खोडसाळपणे कॅमेरा दिसणार नाही. अशा पध्दतीने  मतदान करताना व्हिडीओ शूटिंग काढून गावातील लोकांना कशाप्रकारे मतदान करावे असा सूचक व्हिडिओ तयार व्‍हॉट्‌स ॲप ग्रुपवर व्हायरल केला. गावातील रामकिसन बालचंद चव्हाण, अमोल भादूरसिंग बिल्लारे, नरेंद विनायक गडकर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार खामगाव यांच्याकडे तक्रार दाखल करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. निवडणुकीचे बेकायदेशीरपणे व्हिडीओ चित्रीकरण करून चुकीच्या पध्दतीने मतदान केले आहे. ही बाब गुप्तमतदान प्रक्रियेचा भंग असून, संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पिंपळगाव राजा पोलिसांनी प्रताप धोती याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: