मार्केट लाइव्ह

मथुरा लॉन्स अँड शिवशक्ती अ‍ॅग्रोटेक… व्यवसायाचा अफलातून यशस्वी प्रयोग

मराठी माणूस व्यवसाय, धंदे यात कमी पडतो, कचरतो, असा एक गैरसमज आहे. मात्र अनेक ठिकाणी, अनेक मराठमोळ्या माणसांनी हा गैरसमज साफ चुकीचा असल्याचे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. संत गजानन महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या, विदर्भ पंढरी शेगाव नगरीतील विनायक भानुदास भारंबे हे त्याचे आदर्श उदाहरण ठरावे. त्यांनी नेहमीची पाऊल वाट सोडून वेगळा मार्ग स्वीकारला. आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाला व्यवसायिकतेची जोड दिली. आई- वडील अन् दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, योगगुरू रामदेव बाबा यांना आदर्श मानत एक अफलातून संयुक्त व्यवसाय सुरू केला, वाढविला अन् प्रगती पथावर नेला…!

लागोपाठ शिवशक्ती इरिगेशन अँड अ‍ॅग्रोटेक आणि मथुरा लॉन्स अँड मॅरेज हॉल असा आगळावेगळा व्यवसाय सुरू करून मंगल आणि मांगल्य याचा संगम घडवून आणला. 2000 मध्ये शिवशक्ती इरिगेशन तर 2019 मध्ये मथुरा लॉन्स कार्यान्वित झाले. रोकडिया हनुमान मंदिर जवळील हे प्रतिष्ठान अगदी पहिल्यापासून हटके ठरले. रमणीय निसर्गरम्य परिसरातील मथुरामध्ये प्रशस्त 20 हजार स्क्वेअर फूट लॉन्स, सुसज्ज 10 हजार स्क्वेअर फूट हॉल आणि 1500 स्क्वेअर फूट डिस्कव्हरी हॉलसहित 11 रुमसुद्धा आहेत. हा राजेशाही नजारा पाहून कुणीही प्रभावित अन् प्रफुल्लित होईल, असेच हे डेस्टिनेशन आहे. वाढदिवस, साखरपुडा ते लग्नच काय अगदी कंपनी मिटिंगसाठीसुद्धा हा आदर्श स्पॉट ठरलाय. कोरोना बाबत ही उपाययोजना केल्या आहेत. सॅनिटायझरचा पुरेपूर वापर केला जातो. हॅन्ड सॅनिटायझर स्प्रे मशीन प्रत्येक लग्नात दिला जातो. लग्नाआधी, लग्नानंतर संपूर्ण कार्यालय सॅनिटाईझ केले जाते. शिवशक्ती इरिगेशन व अ‍ॅग्रोटेकमध्ये बागायती शेतीसाठी लागणारे ठिबक स्प्रिंकलर, मोटार पंप, पाईप, ऑरगॅनिक बी बियाणे, कीटकनाशक, सर्व काही उपलब्ध आहेत. याशिवाय बी. टेक (कृषी) असल्यामुळे शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करून त्यांचे उत्पन्न पर्यायाने जीवनमान उंचावण्यावर श्री. भारंबे यांचा भर आहे. यासाठीच या व्यवसायाची निवड केल्याचे त्यांनी बुलडाणा लाईव्हशी बोलताना सांगितले. भविष्यात व्यवसाय विस्तार करून भव्य कृषी मॉलची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक बांधिलकी

दरम्यान, व्यावसायिक असले तरी विनायकभाऊंनी सामाजिक भान जोपासले आहे. मथुरा लॉन्समध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, शहिद सैनिक कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी भाड्यात चक्क 50 टक्के सूट देण्यात येते. मथुरा लॉन्समध्ये 18 ऑगस्ट 2019 रोजी पतंजली परिवार, विठ्ठल परिवार, जायन्ट्स ग्रुप, शेगाव सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनी यांनी साजरा केलेला माझा 41 वा वाढदिवस अविस्मरणीय क्षण ठरल्याचे त्यांनी चर्चेच्या समारोपात सांगितले.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: