जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी; खासदार जाधव संसदेत बोलले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भाजपचे राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करतात. मात्र त्यांच्याच पक्षाचे केंद्र सरकार मराठा आरक्षणात खोडा घालते, असा आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. लोकसभेत १२७ व्या घटना दुरुस्तीसंदर्भात आज, १० ऑगस्टला झालेल्या चर्चेत खासदार जाधवांनी सहभाग घेतला होता.

१२७ व्या घटना दुरुस्तीने राज्य सरकारांना मागणी असलेल्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार दिले आहेत. मात्र राज्य सरकारचा ५० टक्के आरक्षणाचा कोटा यापूर्वीच संपलेला आहे. या विधेयकामुळे राज्याराज्यांत व वेगवेगळ्या समाजामध्ये वाद होतील. असंतोष निर्माण होईल. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून देण्याचे अधिकार जर केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले तरच या विधेयकाचे समर्थन आम्ही करू, असेही खासदार जाधव म्हणाले. केंद्र सरकारने जर राज्य सरकारला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे अधिकार दिले तर महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. मात्र एखाद्या व्यक्तीला जेवणाचे आग्रहाचे निमंत्रण द्यायचे, पंचपक्वानाचे ताट वाढायचे आणि त्याचे हात बांधून ठेवायचे असा प्रकार १२७ व्या घटनादुरुस्तीच्या विधेयकातून होत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: