खामगाव (घाटाखाली)

मराठा पाटील युवक समितीचे अनेक पदाधिकारी झाले गावाचे कारभारी!

खामगाव (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  मराठा पाटील युवक समितीने ग्रामपंचायत निवडणुकीत आपला प्रभाव दाखवला आहे. समितीचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य  ठिकठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येने निवडून आले आहे़त.

मराठा पाटील युवक समितीचे संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक कार्य सुरू असतात. दरवर्षी समितीकडून संस्थापक अध्यक्ष गजाननदादा ढगे पाटील यांच्या मार्गदर्शनात विविध समाजोपयोगी कार्यक्रम पार पाडले जातात. यात सोयरिक पुस्तिका हा समाजासाठी एक मोठा उपक्रम दरवर्षी पार पाडला जातो़. याचबरोबर गरजू आणि दिनदुबळ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असे अनेक उपक्रम समितीकडून राबविले जातात़. गजानन ढगे यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात मराठा पाटील युवक समितीच्या अनेक ठिकाणी  शाखा  उघडण्यात आल्या आहेत़. नुकतेच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये मराठा पाटील युवक समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनीही उमेदवार म्हणून आपले राजकिय भविष्य आजमावले. यामध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. काही गावांमध्ये समितीच्या पदाधिकार्‍यांचे पॅनल निवडून आले आहे़. यामध्ये मराठा पाटील युवक समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे पाटील हे सुटाळा खुर्द ग्रामपंचायतीवर तसेच स्वप्नीलदादा पाटील यांच्या पत्नी सौ़ मीनलताई स्वप्नील ठाकरे या सुध्दा भरघोस मतांनी सुटाळा खुर्द ग्रामपचांयतीवर निवडून आल्या आहेत़. तसेच सुटाळा बु़ ग्राम पंचायतीमधून मोहन घुईकर, विनोद भुसारी पेंडका, ज्ञानेश्‍वर महाले ज्ञानगंगापूर, अमोल गोळे  वरूड, सौ. जयश्री बळीराम हिंगणे तिंत्रव, धनराज पाटील जवळा, गोपाल कान्हेरकर शेलोडी, शंकर पाटील वडगाव, मनोज बानाईत शेलोडी, अनंत त्रिकाळ यांच्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात मराठा पाटील युवक समितीचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य निवडून आले आहे. मराठा पाटील युवक समिती सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असते. आता राजकिय क्षेत्रातही मराठा पाटील युवक समितीचा ठसा उमटला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: