क्राईम डायरीमुख्य बातम्या

मलकापुरात धाडसी चोरी! flipkart चे कार्यालय फोडून सव्वा सहा लाख रुपये लंपास

मलकापूर (गजानन ठोसर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मलकापूर शहरातील बुलडाणा रोडवरील फ्लिपकार्टच्‍या डिलिव्हरी कार्यालयात धाडसी चोरी समोर आली आहे. आज, 14 जूनच्‍या सकाळी समोर आलेल्या या घटनेत तब्बल सहा लाख पंचवीस हजार रुपयांची रोखरक्कम लंपास करण्यात आली आहे.

बुलडाणा रोडवरील वानखेडे पेट्रोलपंपाजवळ ठाकूर इस्टेटमध्ये फ्लिपकार्टचे डिलिव्हरी कार्यालय आहे. आज पहाटे चारच्या सुमारास कार्यालयाचे शटर वाकवून चोरट्यांनी कार्यालयात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील तिजोरी लंपास केली. यात सहा लाख पंचवीस हजार रुपयांची रोकड होती, अशी फिर्याद रोशन निकम यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. ग्राहकांनी ऑनलाइन मागविलेल्या वस्तू या कार्यालयाद्वारे ग्राहकांच्या घरी पोहोचविल्या जातात. शुक्रवार, शनिवार, रविवार या तीन दिवसांची डिलिव्हरी घरोघरी पोहोचवून जमा झालेली रक्कम कार्यालयातील गोदरेज कपाटात एका तिजोरीत ठेवली होती.

आज सकाळी कार्यालय उघडण्यासाठी निकम गेले असता कार्यालयाचे शटर वाकलेले दिसल्याने त्‍यांनी याबाबतची माहिती शहर पोलिसांना दिली. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर, ए.पी.आय स्मिता म्हसाये, ए.पी.आय सुखदेव भोरकडे, पो.उप.नि.छाया वाघ, डी.बी.पथकाचे पो.काँ.अनिल डागोर, ईश्वर वाघ, संजय पठार, संतोष कुमावत, आसीफ शेख, गोपाळ तारुळकर, मंगेश चरखे यांच्‍यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सीसीटिव्हीत दोघे चोरटे दिसत असून, पो.नि.काटकर यांनी फिंगर प्रिंट तज्‍ज्ञ, तसेच श्वानपथकाला पाचारण केले. लवकरच चोरट्यांचा शोध लावून त्यांना जेरबंद करण्यात केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: