क्राईम डायरीमुख्य बातम्या

मलकापूरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 5 जण पकडले

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मलकापूर शहरात रंगलेल्या जुगार अड्ड्यावर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) छापा मारून 5 जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 24,340 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 3 एप्रिलच्या रात्री ही कारवाई करण्यात आली.

चंद्रकांत दिनकर उजैनकर(30, शास्त्रीनगर मलकापूर), मोहन अमरचंद निकम (45, रा. वाकोडी, ता. मलकापूर), गोपाल काशिनाथ केने (35, रा. किनी ता. मलकापूर), अनिल भारुका, मुकेश पंडित दोघेही (रा. शास्त्रीनगर, मलकापूर) यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडील रोख व जुगार साहित्य जप्त करण्यात आले. त्‍यांच्‍याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: