क्राईम डायरीमुख्य बातम्या

मलकापूरमध्ये पकडला पावणेदोन किलो गांजा!; दोघे ताब्‍यात, “एलसीबी’ची कारवाई

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) एक किलो ९०० ग्रॅम गांजासह दोघांना ताब्‍यात घेतले. ही कारवाई दाताळा (ता. मलकापूर) येथे २५ जुलैच्‍या दुपारी करण्यात आली. शब्बीर शाह कासम शाह (५५) आणि अहमद शाह कासम शाह (१९, रा. मलकापूर) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दोघे मोटारसायकलने गांजा घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती “एलसीबी’ला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने उमाळी रोडवरील रेणुका माता मंदिराजवळ दोघांना पकडले. त्यांच्याजवळ एक किलो ९०० ग्रॅम गांजा अंदाजे किंमत २२ हजार ८०० रुपये व रोख २०० रुपये तसेच बजाज पल्सर मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींना काल, २६ जुलै रोजी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा), अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पो.ना. गजानन गोरले, पो.काँ. राहुल बोर्डे यांनी पार पाडली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: