बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मलकापूरला बुलडाणा अर्बन नव्‍या जागेत होणार स्‍थलांतरित, आज सोहळा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  बुलडाणा अर्बन बँकेची मलकापूर शाखा आज, 13 एप्रिलला भारत कला रोडवरील एलआयसी कार्यालयाच्‍या बाजूला स्‍थलांतरित होत आहे. हा स्‍थलांतरण सोहळा कोरोनाविषयक   नियम पाळून दुपारी 4 ते 7 वाजेदरम्‍यान होणार आहे.

बुलडाणा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा इंटरनॅशनल को-ऑप. अलायन्स एशिया पॅसिफीक युथ कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांच्‍या हस्‍ते हा सोहळा होत असून, बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्‍थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्‍या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर यांची प्रमुख उपस्‍थिती राहणार आहे. बद्री कॉम्‍प्लेक्‍समधील जुनी वास्‍तू अपुरी पडत असल्याने नव्‍या जागेत बँक स्‍थलांतरित होत आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: