खामगाव (घाटाखाली)मुख्य बातम्या

मलकापूर ः वरखेडचे सरपंच पद राहिले रिक्त; निवडणुकीत नारी शक्तीला 19 पदे, वाचा तालुक्यात कोण झाले सरपंच, उपसरपंच

मलकापूर (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी आज, 9 फेब्रुवारीला निवडणुका घेण्यात आल्या. वरखेडचे रिक्त राहिलेले सरपंच पद आणि नारीशक्तीला मिळालेला सन्मान निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
मलकापूर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त अध्यासी अधिकार्‍यांनी सुरळीतपणे निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी सांभाळली. आरक्षणामुळे वरखेडचे सरपंच पद रिक्त राहिले असतानाच उपसरपंचपदी संग्रामसिंह राजपूत यांची निवड झाली. उर्वरित गावांचे कारभारी असे ः धरणगाव सरपंच संगीता पाटील, उपसरपंच अमित झनके, भालेगाव सरपंच तेजस घुले, उपसरपंच प्रीती वराडे, नरवेल सरपंच प्रणाली कोलते, उपसरपंच अजय न्हावकर, लासुरा सरपंच लता गवई, उपसरपंच अर्चना आढाव, हरणखेड सरपंच राधा राणे, उपसरपंच नंदकिशोर इंगळे, तांदुळवाडी सरपंच सरला भारंबे, उपसरपंच संगीता गायकवाड, घिर्णी सरपंच वसंत बगाडे, उपसरपंच संदीप चव्हाण, लोणवडी सरपंच प्रियांका खर्च, उपसरपंच परीक्षित खर्चे, जांभुळधाबा सरपंच सुरेखा वाघोदे, उपसरपंच भास्कर इंगळे, शिरढोन सरपंच उज्ज्वला पाटील, उपसरपंच पद्मिनी नारखेडे, कुंड बुद्रुक सरपंच नीलेश पाटील, उपसरपंच मनीषा चित्रांग, कुंड खुर्द सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच शेषराव फुलपगारे, दुधलगाव खुर्द सरपंच योगेश नेहते, उपसरपंच नेहा गाढे, हिंगणा काझी सरपंच सुभाष गंगतिरे, उपसरपंच शेख रशीद, वडजी सरपंच दीपाली खर्चे, उपसरपंच लक्ष्मण इंगळे, तिघ्रा सरपंच स्वाती सुरडकर उपसरपंच उषा तायडे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: