बुलडाणा (घाटावर)

मलकापूर पांग्रा येथे महाविकास आघाडीचा झेंडा!

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत महाविकास आघाडी परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला. युवाशक्ती परिवर्तन पॅनलचा पराभव झाला आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या मलकापूर पांग्रा ग्रामपंचायतीच्या एकूण 13 जागांकरिता 24 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात वॉर्ड क्रमांक 1 मधून साबीर खान नजफ खान पठाण, सौ. गंगुबाई आबाराव साळवे, सौ. अनिता बंडू उगले, वॉर्ड क्रमांक 2 मधून नामदेव उगले, चंद्रकला काशिनाथ काकडे, वॉर्ड क्रमांक 3 मधून किरण काकडे, वॉर्ड क्रमांक 4 मधून भगवानराव उगले व सौ. पार्वती यादव टाले, वॉर्ड क्रमांक 5 बद्रीनाथ अर्जुन काळे, शहजाद खाँ जिलानी पठाण, शेख समीना निसार यांनी विजयश्री प्राप्त आहे. आधीच दोघे जण वॉर्ड क्रमांक 3 मधून सौ. संगीता राधाकिसन देशमुख व वॉर्ड क्रमांक चारमधून सौ. अर्चना राधेश्याम वहिले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. सर्व मिळून महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलच्या 11 जागा तर ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवार दोन जागी निवडून आले आहेत. सर्व जागा लढवणार्‍या युवाशक्ती परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: