बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण फक्‍त जिल्हाधिकारी कार्यालयातच होणार, तेही साधेपणाने!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र राज्य स्थापनेला 1 मे 2021 रोजी 61 वर्षे पूर्ण होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजता अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष इतक्याच पदाधिकारी, अधिकाऱ्यांना उपस्थित रहावयाचे आहे. कार्यक्रमादरम्यान कवायत, संचलन आयोजनास मनाई आहे. जिल्ह्यात इतरत्र कोणत्याही कार्यालयामध्ये ध्वजारोहण समारंभ ठेवू नये, असे निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे यांनी कळविले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: