क्राईम डायरीमुख्य बातम्या

महाराष्ट्र बँकेच्‍या मॅनेजरला १ कोटीने गंडवायला निघाला… पण मॅनेजर लई हुश्शार निघाले, त्‍यालाच पकडून दिले!!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा येथील महाराष्ट्र बँकेच्‍या शाखा व्यवस्थापकांना एक कोटी रुपयांनी गंडविण्याचा प्रयत्‍न झाला. हा प्रकार आज, ३ ऑगस्टला सकाळी अकराला घडला. शाखा व्यवस्थापकांच्‍या सतर्कतेमुळे आरोपीला अटक करण्यात आली आहे. फिरोज हुसेन खान (४३, रा. टाटा पॉवर कॉलनी मुरबाड रोड कल्याण ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.

शाखा व्यवस्थापक राजन संतोषकुमार सिंग (रा. इंगळे ले आऊट नांदुरा) यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की आज सकाळी अकराच्‍या सुमारास फिरोज हुसेन खान हा बँकेत दोन डीडी (डिमांड ड्राफ्‍ट) घेऊन आला. यातील एक डीडी 67 लाख रुपयांचा व दुसरा डीडी 33 लाख रुपयांचा होता. दोन्ही डीडी बँकेत घेऊन आल्यानंतर तो म्हणाला की हे पैसे माझ्या खात्यात जमा का झाले नाही? डीडीची पाहणी केली असता त्या डीडीवर शाखा व्यवस्थापकांच्‍या नावाची बनावट सही दिसून आली. या तक्रारीवरून फिरोज खान हुसेन खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पीएसआय सुनील दौड करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: