बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

महावितरणचा कोरोनाला फटका! 2 दिवसांचे अहवाल मिळाले एकत्र, पॉझिटिव्हचा आकडा फुगला!! 837 जण बाधित; तिघांचा मृत्‍यू

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हेडिंग वाचून वाचकच काय कुणीही बुचकळ्यात पडणार हे नक्की. पण हा फटका अप्रत्यक्ष आहे. साक्षात प्रयोगशाळेचा वीज पुरवठा खंडित असल्याने 2 दिवसांचे अहवाल एकत्र आले आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्‍णांचा आकडा एकदम शेअर मार्केटच्या सेंसेक्सप्रमाणे उसळून तब्बल 837 वर पोहोचला! मात्र हा फुगीर आकडा असल्याने नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाहीये! दरम्‍यान, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तिघांचा मृत्‍यू झाला असून, यामुळे एकूण बळींचा आकडा 198 वर गेला आहे.
परवा 4 मार्चला स्वॅब टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा बंद राहिली. यामुळे काल आरटीपीसीआरचे फक्त 8 अहवाल मिळाले होते. रॅपिडचेच अहवाल मिळाले असल्याने सरासरीच्या तुलनेत फक्त 108 रुग्ण आढळले होते. ती तांत्रिक घट होती हे बुलडाणा लाईव्हच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले होते. परिणामी आज 3575 अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 837 पॉझिटिव्ह आहेत. यातील आरटीपीसीआर अहवालाचा आकडा 2823 इतका आहे.
तालुकेही फुगले…
दरम्यान, या विचित्र घडामोडीमुळे तालुकानिहाय रुग्ण वाढल्याचे दिसून येते. यात बुलडाणा तालुक्‍यात 127, खामगाव 57,शेगाव 99, देऊळगावराजा 54, चिखली 83, मेहकर 24, मलकापूर 36, नांदुरा 61, मोताळा 61, जळगाव जामोद 77 संग्रामपूर 92, सिंदखेडराजा 47.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: