क्राईम डायरी

महिलांना धमकावले, शेगावमध्ये एकाविरुद्ध गुन्‍हा दाखल

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विवेकानंद चौक परिसरात महिलांना धमकावणाऱ्या खामगाव येथील व्यक्तीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद चौक परिसरात राहणाऱ्या श्रीमती मालती व्यास व त्यांची सून घरात असताना 23 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेदरम्यान ज्ञानेश्वर जांगिड तेथे आला. जोरजोरात ओरडू लागला. त्याला मालती व्यास व मुलगा आशिष या दोघांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने जीवे मारण्याची धमकी दिली व शिविगाळ केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: