क्राईम डायरीमुख्य बातम्या

महिला पोलिसाचे घर फोडून लांबवले पावणेदोन लाखांचे दागिने!; बुलडाणा शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः महिला पोलिसाचे घर फोडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजार रुपयांचे दागिने लांबवल्याची घटना बुलडाणा शहरातील समतानगर येथील व्‍यंकटगिरी अपार्टमेंटमध्ये 24 मे रोजी संध्याकाळी समोर आली. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलीस कॉन्‍स्‍टेबल लता मोतीराम बरडे (30) या बुलडाणा पोलीस मुख्यालयात ड्युटीला आहेत. त्‍या समतानगरातील व्‍यंकटगिरी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्‍या 19 मे रोजी सकाळी 9 वाजता घराला कुलूप लावून बहीन छायाबाई बरडे यांच्‍याकडे गेल्या होत्‍या व त्‍यांच्‍याकडेच थांबल्या. 24 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता त्‍यांना शेजारी राहणाऱ्या सौ. छायाबाई मिलिंद रणाइत यांनी फोनव्दारे तुमच्‍या दरवाजाचा कोयंडा तुटलेला असल्याचे सांगितले. त्‍यामुळे लता बरडे या रात्री 8 च्‍या सुमारास घरी गेल्‍या असता बेडरूमधील लोखंडी कपाट उघडे दिसले. त्यातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्‍या स्टीलच्‍या डब्‍ब्‍यात सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत.

चोरट्याने बेडरूममधील पलंगाचे उशीखाली ठेवलेल्या चाव्याने कपाट उघडून दागिने चोरले. यात 3 मनिमंगळसूत्र, गंठन पोत वजन 40 ग्रम किंमत 75000 रुपये, एक सोन्याचा गोफ वजन एक तोळा किंमत 25000 रुपये, 3 सोन्याच्या अंगठ्या किंमत 30000 रुपये, सोन्याचे कानातले झुमके व कर्णफूल जोड प्रत्येकी वजन 5 ग्रॅम किंमत 25000 रुपये, चांदीचे जोडवे 8 नग व चैनपट्ट्या वजन 10 तोळे किंमत 3000 रुपये, चांदीच्या पाटल्या वजन 14 तोळे किंमत 5000 रुपये असे सोन्या चांदीचे दागिने एकूण 1,70,000 रुपये किंमतीचे चोरट्याने 19 मे 24 मे दरम्यान चोरून नेले. या प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. गवारगुरु करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: