बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

महिलेच्या मृत्यूस कारणीभूत आरोपीला फाशी द्या; जिल्हाधिकारी, एसपी कार्यालयावर महिलांची धडक

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन गटांत क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत जखमी कांता अंकुश सावळे (49) यांचा 11 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा निषेध करत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी समाधान मोरेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आरोपीच्या आईचे नगरसेविका पद रद्द करण्याचीही मागणी भीमनगर वॉर्ड क्र. 2 येथील महिलांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
9 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कुत्र्याला हाड हाड म्हटल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा 11 फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर छाया थाटे, अनिता कुंडेकर, अनिता जाधव, रेखा पंडीत, चंद्रभागा निकाळजे, वैशाली वाघ, शालू नरवाडे, आशा हिवाळे, रेखा आठवले, कुसूम पवार,आशा सपकाळ, अनिता कांबळे, प्रतीभा जाधव, पंचफुला पडघान आदींसह 73 महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: