क्राईम डायरी

महिलेला मारहाण करत बेइज्जत करण्याची धमकी!; खामगाव तालुक्यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिलेला मारहाण करत बेईज्जत करण्याची धमकी देणार्‍या बापलेकांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना उमरा लासुरा (ता. खामगाव) येथे 1 फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली.
26 वर्षीय पीडितेने तक्रार दिली, की बाळकृष्ण शालिग्राम दांडगे, विशाल बाळकृष्ण दांडगे, पंकज बाळकृष्ण दांडगे (रा. उमरा) हे पीडितेच्या घरासमोर जनावरे बांधल होते. त्यांना पीडितेने इथे जनावरे बांधू नका, असे म्हटले. त्यावरून तिघांनी तिच्यासह तिच्या पतीलाही मारहाण केली. तिच्या उजव्या मनगटावर मारहाण केली. यात मनगट व करंगळीस मार लागला आहे. बाळकृष्णने तिला अश्‍लील शिविगाळ करत मारण्याची व बेईज्जत करण्याची धमकी दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोकाँ. राजेश गाडेकर करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: