क्राईम डायरीमुख्य बातम्या

मांडव्‍यात पावणेदोन लाखांची घरफोडी; दागिन्यांवर डल्ला

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी दागिन्‍यांसह 1 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल गायब केल्याची घटना मांडवा (ता. लोणार) येथे काल, 11 मार्चला सकाळी समोर आली.
प्रल्हाद आबाराव दराडे यांच्‍या घरात 10 मार्चच्‍या रात्री अकराच्‍या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजाचा कडीकाेयंडा तोडून प्रवेश केला. घरातील सोन्‍याचे दागिन्‍यांसह 1 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी प्रल्हाद दराडे यांनी बिबी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. तपास पीएसआय श्री. व्‍यवहारे, विजय पवार, पंडित नागरे करत आहेत. श्वानपथक व फिंगर प्रिंट तज्‍ज्ञांनाही घटनास्‍थळी पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वानपथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: