क्राईम डायरीमुख्य बातम्या

माणूसपणच हरवलं… धुऱ्यावरून झालेल्या वादाचा व्हिडिओ पहा अन्‌ तुम्‍हीच सांगा… हे योग्‍य आहे?; सिंदखेड राजातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतीच्‍या धुऱ्याचा वाद लई बेक्कार… माणसाचं माणूसपणच हिरावतो… डावरगाव ( ता. सिंदखेडराजा) शिवारात शेतीच्या धुऱ्यावरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्‍हायरल होतोय. अनेकांनी या घटनेवर चिंता व्‍यक्‍त केली. माणूस लोभापायी किती माणुसकी विसरला, याचे दृश्यच या व्हिडिओतून समोर आले आहे. अंगावर थरकाप उडवणारा हा व्हिडिओ बातमीच्‍या खाली वाचकांना बघायला मिळेल. प्रतिक्रिया देण्यास विसरू नका. या हाणामारी प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. 23 जूनच्‍या सायंकाळी ही घटना घडलेली आहे.

मंदा सोळंके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डावरगाव येथील खरात व सोळंके परिवारात गेल्या 10 वर्षांपासून शेतीचा वाद आहे. 23 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धुरा व पेरणीच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला. वादातून खरात कुटुंबियांनी लाठ्याकाठ्या आणि कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात सोळंके परिवारातील तिघे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत.

या तक्रारीत म्‍हटले आहे, की पती प्रकाश सोळंके, सासरे बाळासाहेब सोळंके, सासू बेबी सोळंके, दीर गजानन सोळंके, जाऊ स्वाती सोळंके, मुलगा प्रशांत व मुलगी वैष्णवी, पुतणी दुर्गा, पुतण्या देवांश हे पेरणीसाठी शेतात गेले असता, बाजूच्या शेतात असलेल्या, खरात कुटुंबानी सोळंकी कुटुंबावर कुऱ्हाडीने व लाठ्या- काठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. यात बेसावध असलेले सोळंके परिवारातील तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे. खरात परिवारातील 7 जणांविरोधात पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://youtu.be/RshxO_uqtVY

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: