क्राईम डायरी

माहेरी आलेल्या विवाहितेला मारहाण; आज्जीसासूलाही काठीने मारले!; मलकापूर शहरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पतीच्‍या त्रासाला कंटाळून मुलासह माहेरी आलेल्या 20 वर्षीय विवाहित तरुणीस तिच्‍या पतीने माहेरी येऊन मारहाण केली. मध्ये पडलेल्या विवाहितेच्‍या आजीलाही त्‍याने काठीने मारहाण केली. ही घटना मलकापूर शहरातील सालीपरा भागातील रमाबाईनगरात काल, 29 जूनला रात्री साडेनऊच्‍या सुमारास घडली.

सौ. अनुराधा आकाश सरदार (20) या विवाहितेने आजी गं.भा सुमनबाई होनाजी सरदार यांच्‍यासह शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीत तिने म्‍हटले आहे, की पती आकाश नेहमी दारू पिऊन मारहाण करतात. त्‍यामुळे 8 दिवसांपासून माहेरी मुलांसह राहण्यास आली होती. काल रात्री 9.30 वाजता सुमारास पती तिथे आले. तू माहेरी का आली. तू मुलासह माझ्यासोबत चल, असे म्‍हणाले. तू दारू पितो. मी तुझ्यासोबत येत नाही, असे त्‍याला म्‍हणाली असता त्‍याने लाथाबुक्‍क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आजी भांडण सोडविण्यास आली असता त्‍याने काठीने तिलाही मारहाण केली. आरडाओरड्यामुळे पती तिथून निघून गेला, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. त्‍यावरून पोलिसांनी पती आकाशविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: