क्राईम डायरीमुख्य बातम्या

मुलीच्‍या घरी गाय पोहोचवून पायी परत निघाले, मध्येच आयशर बनले काळ!

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलीच्या घरी खोलखेड येथे गाय पोहोचवून पायी घरी परतणाऱ्या वृद्धाला आयशर वाहनाने उडवले. यात त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. ही घटना नांदुरा- खामगाव रोडवरील आंबोडा फाट्यानजिक काल, ४ ऑगस्‍टला सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास घडली.

आनंदा हुसन शिंदे (५५, रा. धाडी, ता. नांदुरा) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. आयशर वाहनाच्‍या (क्र. GJ04 AW 36 71) चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे व भरधाव चालवून शिंदे यांच्‍या मृत्‍यूस कारणीभूत ठरला. त्‍यानंतर ताब्यातील वाहन जागेवरच सोडून पळून गेला. शिंदे यांचा भाचा उमेश कडू अहीर (२९, रा. धाडी ता. नांदुरा) यांनी वाहनचालकाविरुद्ध काल रात्री ११ ला जलंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तपास एएसआय दिनकर तिडके करीत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: