क्राईम डायरीमुख्य बातम्या

मुलीला पळवणाऱ्याला नाशिकमधून आणले पकडून; डोणगाव पोलिसांची कामगिरी

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्‍याची घटना मेहकर तालुक्यातील आंधूडमध्ये १२ ऑगस्ट रोजी घडली होती. मुलीच्या वडिलांना शारा (ता. लोणार) येथील एका तरुणावर संशय व्‍यक्‍त केला होता. त्‍याच्‍याविरुद्ध २० ऑगस्टला डोणगाव पोलीस ठाण्यात केली होती. पोलिसांनी शारा येथील गीता लक्ष्मण फडके व सागर लक्ष्मण फडके या मायलेकांविरुद्ध गुन्हा दाखल करून सागर आणि मुलीचा शोधही सुरू केला होता. अखेर नाशिकमधून सागरला या मुलीसह काल, २४ ऑगस्‍टला ताब्‍यात घेण्यात आले आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तपास केला. तांत्रिक माहितीसह मोबाइल लोकेशनच्या आधारे सागर नाशिक येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यामुळे पोलिसांनी वेळ न दवडता लगेचच एक पथक नाशिकला रवाना झाले. त्‍याला नाशिकमधून ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासोबत अल्पवयीन मुलगीसुद्धा होती. दोघांनाही डोणगाव येथे आणण्यात आले असून, मुलीची वैद्यकीय तपासणी करून आई- वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: