क्राईम डायरीमुख्य बातम्या

मेडिकलवर औषधी आणायला गेलेली मुलगी अचानक गायब!; मुलीचे वडील म्हणतात शेजारच्यांनी पळवली!!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पोट दुखत होते म्हणून मेडिकलवर औषध आणायला गेलेली नांद्रा कोळी (ता. बुलडाणा) येथील 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी आज, 27 मार्चला बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी तक्रार  दिली. त्‍यावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलगी आई- वडिलांसह पुण्यात राहत होती. तिच्या लग्न संबंधासाठी ती आई- वडील व छोट्या भावासह 15 दिवसांपासून गावाकडे आली होती. यावेळी त्यांच्‍यासोबत त्यांचा पुणे येथील शेजारी सचिन धोंगडे हा सुद्धा आला होता. पुण्यात असताना सचिन व त्याची पत्नी समृद्धीशी मुलीच्या घरच्‍यांचे कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे नांद्राकोळी येथे असताना अल्पवयीन मुलगी सचिनच्‍या मोबाइलवरून त्याच्या पत्नीशी नेहमी फोनवर तास न्‌ तास बोलायची. 22 मार्च रोजी दुपारी  जेवण करत असताना ती फोनवर समृद्धीशी फोनवर बोलत असताना अचानक तिचे पोट दुखत असल्याचे सांगून मेडिकलवर गेली. त्‍यानंतर बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिचा शोध घेतला असता मिळून आली नाही. मुलीच्या वडिलांनी पुण्यात जाऊन शेजारी समृद्धी घोंगडे हिला विचारपूस केली असताना आपल्याला माहित नाही. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे म्हणाल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. आपल्या मुलीला सचिन व त्‍याच्‍या पत्‍नीनेच फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी आज बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: