बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मेहकरजवळ आढळलेल्या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष बाराव्‍या शतकातील

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरानजिक जानेफळ रस्‍त्‍यावरील फैजलापूर शिवारातील अनिल इंगळे यांच्‍या शेतालगतच्‍या नाल्याचे खोदकाम सुरू असताना हेमाडपंथी मंदिराचे अवशेष 27 मे रोजी सकाळी आढळले होते. पुरातत्‍व विभागाच्‍या नागपूर येथील तज्‍ज्ञांनी 31 मे रोजी पाहणी करून मंदिराचे हे अवशेष 12 व्‍या शतकातील असू शकतात, असे मत व्‍यक्‍त केले आहे. भग्‍न अवस्‍थेतील मूर्त्या, नंदी, सभामंडपाचे कोरीव खांब या ठिकाणी आढळले आहेत.

पुरातत्‍व विभागाच्‍या सहायक संचालक जया वाहने यांनी सांगितले, की या ठिकाणी नदी वाहत असेल व नदीच्‍या प्रवाहाने मंदिर कोसळून गाडले गेले असेल. या ठिकाणी उत्‍खनन करणे गरजेचे असून, तशी परवानगी मुंबईच्‍या कार्यालयाकडून घेतली जाईल. मेहकर येथील कंचनीचा महाल, बारव, घुमट आदी पुरातन वास्‍तूंची पाहणीही अधिकाऱ्यांनी केली. यावेळी पुरातत्‍व विभागाचे अधिकारी नीकेश खुबाडकर, आमदार डॉ. संजय रायमूलकर, तहसीलदार संजय गरकल आदींची उपस्‍थिती होती.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: