क्राईम डायरीमुख्य बातम्या

मेहकर शहरात मोठा दरोडा; 5 जण घरात घुसले, 4 लाख लुटले

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरात 5 जणांनी घरात घुसून 3 ते 4 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना आज, 6 फेब्रुवारीला पहाटे 3 च्या सुमारास घडली आहे. डोणगाव रोडवर असलेल्या कृषी वैभव लॉनच्या मागे बालाजीनगरात सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव राठोड यांच्या घरी ही मोठी घरफोडी झाली आहे.
आज पहाटे 3 ला 5 जणांनी घर फोडत घरात प्रवेश केला. राठोड परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील रोख व दागिने असा एकूण तीन ते चार लाखांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोर गेल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: