बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मोजक्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या उपस्‍थितीत पालकमंत्र्यांनी केले ध्वजारोहण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा अत्यंत साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज, 1 मे रोजी पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी श्री. गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे आदींची उपस्थिती होती. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर उपाययोजना हाती घेण्यात आले आहे. यावर्षीचा महाराष्ट्र दिन कार्यक्रमही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिनी जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी कार्यालयातच ध्वजारोहण करण्याबाबत सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत साधेपणे साजरा करण्यात आला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: