बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

मोताळ्याची माकोडी जिल्ह्यात सर्वांत सुंदर!; आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आर. आर. (आबा) पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज, 16 फेब्रुवारी रोजी तालुका सुंदर व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार योजनेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी सभागृह येथे घेण्यात आला. यात जिल्ह्यातून पहिला पुरस्कार मोताळा तालुक्यातील माकोडी गावाला मिळाला आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार, उपाध्यक्षा सौ. कमलताई बुधवत, सभापती रियाजखाँ पठाण, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पं. स. मोताळा सभापती प्रकाश बस्सी आदी उपस्थित होते. जि. प. अध्यक्षा मनिषाताई पवार म्हणाल्या, की या स्पर्धेत सहभाग नोंदवत पारितोषिक मिळालेल्या ग्रामपंचायतींपासून अन्य ग्रामपंचायतींनी प्रेरणा घ्यावी. पुढील वर्षी आपल्या ग्रामपंचायतीला कसे पारितोषिक मिळेल यादृष्टीने काम करावे. ग्राम विकासाच्या योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबवून ग्रामपंचायतींनी आपली ग्रामविकासातील भूमिका अधोरेखीत करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले. त्यांनी स्पर्धेची माहिती दिली.
सन 2019-20 चे उत्कृष्ट कामगिरी केलेले तालुका सुंदर गाव व जिल्हा सुंदर गाव स्पर्धेतील पारितोषिक विजेते ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व विस्तार अधिकारी (पंचायत) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार योजनेतंर्गत राज्य शासनाकडून तालुका सुंदर गावाकरिता 10 लक्ष रुपये व जिल्हा सुंदर गावाकरिता 40 लक्ष रुपये पारितोषिक घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार पारितोषिक विजेत्या गावांना पारितोषिक रकमेचा धनादेश देण्यात आला. सूत्रसंचालन चंद्रशेखर जोशी यांनी केले. आभार प्रदर्शन सहायक गट विकास अधिकारी भरत हिवाळे यांनी केले.
या ग्रामपंचायती आहेत विजेत्या…

  • जिल्हा सुंदर गाव पुरस्कार विजेती ग्रामपंचायत : माकोडी ता. मोताळा
  • तालुका सुंदर गाव पारितोषिक विजेत्या ग्रामपंचायती : बुलडाणा – हतेडी खुर्द, चिखली – सावरगाव डुकरे, देऊळगाव राजा- खल्याळ गव्हाण, सिंदखेड राजा- आडगाव राजा, मेहकर – आंध्रुड, लोणार – आरडव, खामगाव – वझर, शेगाव – खातखेड, संग्रामपूर- उमरा, जळगाव जामोद- सुनगाव, नांदुरा – खुमगाव, मलकापूर – विवरा, मोताळा – माकोडी.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: