क्राईम डायरीमुख्य बातम्या

युवकाच्या आत्महत्येप्रकरणी बापलेकाला अटक!; धाडजवळील घटना; अपमानामुळे घेतला होता गळफास

धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दुचाकीचा धक्का लागून झालेल्या अपघातात महिला जखमी झाल्याने दोघांनी घरी येऊन मारहाण केल्याने झालेल्या अपमानामुळे 30 वर्षीय युवकाने गळफास घेऊन सोयगाव (ता. बुलडाणा) येथे आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रमेश सूर्यभान सोनुने (रा. सोयगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाने नाव आहे. त्याने रमेश रावळकर यांच्या शेतातील मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. 30 जानेवारीला रमेश फराळ चिवडा आणण्यासाठी जामठी येथे दुचाकीने गेला होता. परतताना त्याच्या दुचाकीचा धक्का पप्पू खिरडकर यांच्या दुचाकीला लागला. यात पद्माबाई खिरडकर जखमी झाल्या होत्या. त्यामुळे खिरडकर आणि रमेशमध्ये वाद झाला होता. मात्र ग्रामस्थांनी तो तिथेच मिटवला. मात्र त्यानंतर तुकाराम गोविंदा रावळकर (60), दत्ता तुकाराम रावळकर (32) यांनी रमेशच्या घरी येऊन त्याला आमच्या भाचीला दुचाकीला धक्का देऊन का पाडले असे म्हणत दिवसभरात 3-4 वेळा मारहाण केली होती. मारहाणीमुळे अपमानीत होऊन रमेशने आत्महत्या केली. रमेशच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तुकाराम आणि दत्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक नीलेश अपसुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सागर पेंढारकर व कर्मचारी करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: