रक्‍ताच्‍या थारोळ्यात तरुणाचा मतदेह; मेहकरमध्ये खळबळ, पिस्‍तुलाची गोळी झाडल्याचे दृश्य

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिस्तुलाची गोळी झाडलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह आढळल्याने मेहकरमध्ये खळबळ उडाली आहे. एकतानगरातील शाळा क्रमांक 6 जवळ आज, 6 मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा मृतदेह आढळला. सोनू मोकळे (20, रा. एकतानगर) असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार, प्रभारी ठाणेदार …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पिस्‍तुलाची गोळी झाडलेल्या अवस्‍थेत रक्‍ताच्‍या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह आढळल्‍याने मेहकरमध्ये खळबळ उडाली आहे. एकतानगरातील शाळा क्रमांक 6 जवळ आज, 6 मे रोजी दुपारी साडेबाराच्‍या सुमारास हा मृतदेह आढळला.

सोनू मोकळे (20, रा. एकतानगर) असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यामावार, प्रभारी ठाणेदार श्री. रबडे यांनी घटनास्‍थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. हा खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्‍यामुळे खून कुणी व कशासाठी केला, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रकरणी दोघांचा चौकशीसाठी ताब्‍यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.