क्राईम डायरीमुख्य बातम्या

रात्रीच्या अंधारातील कांड! जिल्हा परिषद आवारात दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले!!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातून भंगार चोरी करणार्‍या दोन चोरट्यांना पोलिसांनी आज, 20 जानेवारी रोजी पहाटे 3 च्या सुमारास रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 44,900 रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आाहेत.

चोरट्यांनी आणखी दोघांची नावे सांगितली असून, यापैकी एक चोरटा हा अल्पवयीन आहे. पहाटे 3 च्या सुमारास शहर पोलीस गस्त घालत असताना पोलिसांना जिल्हा परिषद आवारात संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्याचवेळी काही चोरटे भंगार चोरी करत असताना पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी लगेच चोरट्यांना भंगार साहित्यासह रंगेहात पकडले. आकाश उर्फ गठाण मोहनसिंग ठाकूर (रा. संभाजीनगर, बुलडाणा), आकाश प्रकाश अहिरकर (रा. वॉर्ड क्र. 3, अण्णाभाऊ साठेनगर, बुलडाणा) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण 44,900 रुपयांचे भंगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपास नंदकिशोर काळे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: