क्राईम डायरी

रात्री कामावरून आला की करायचा मारहाण, प्‍लॉटसाठी पैसे आण म्‍हणून छळ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्लॉट घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पत्‍नीचा छळ करणाऱ्या पतीविरोधात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगला पुंडलिक वानखेडे (40, रा. अंबड, जि. जालना, ह. मु. शांतीनिकेतन, सागवन, बुलडाणा) यांचे 1998 मध्ये अंबड येथील पुंडलिक किसन वानखेडे याच्यासोबत लग्न झाले होते. पुंडलिक हा अंबड येथील एका दुकानात कामाला होता. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो रात्री कामावरून परतल्यावर बायकोला नेहमी मारहाण करायचा. प्लॉट घेण्यासाठी बायकोला माहेरहून पैसे आणायला सांगायचा. नकार दिल्यास पुन्हा शारीरिक व मानसिक छळ करायचा.या छळाला कंटाळूनच मंगला वानखेडे या 20 ऑक्टोबर 2020 पासून माहेरी सागवन येथेच राहतात.आज मंगला वानखेडे यांनी पतीविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पुंडलिकविरोधात गुन्हा दाखल केला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: