बुलडाणा (घाटावर)

‘राष्ट्रवादी’च्या वर्धापन दिनानिमित्त आडगाव राजात आरोग्य किटचे वाटप

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या २२ व्‍या वर्धापन दिनानिमित्त आडगाव राजा (ता. सिंदखेड राजा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय शिपे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्‍थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या नेतृत्वात पंचायत समितीचे सभापती गजानन बंगाळे व तालुकाध्यक्ष शिवाजीराजे जाधव यांनी हा उपक्रम राबवला. यावेळी सरपंच रामदास कहाळे, माजी सरपंच अरविंद सोनुने, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडी अध्यक्ष अभिजित राजे जाधव, बाळासाहेब खंडारे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: