क्राईम डायरीमुख्य बातम्या

रूईखेड मायंबाचे माजी सरपंच अपघातात ठार, दोन दुचाकींची धडक, बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दोन दुचाकींच्या धडकेत रुईखेड मायंबा (ता. बुलडाणा) येथील माजी सरपंच व विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष जागीच ठार झाले. हा अपघात काल, 14 एप्रिलच्‍या रात्री 11:30 च्या सुमारास धाड- मोहोरा रस्त्यावर सातगाव म्हसलानजीक झाला. रमेश हरिभाऊ गजधाने (55) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. काल रात्री बाभूळगाव येथील एक कार्यक्रम आटोपून ते रुईखेडकडे परत येत होते. दरम्यान विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: