क्राईम डायरी

नांदुरा रेल्वेस्टेशनसमोरून दुचाकी गायब

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा रेल्वेस्टेशनवर चोर्‍या नवीन नाहीत. आता एका शासकीय कंत्राटदारीची दुचाकीच चोरांनी गायब केली आहे. बराच शोध घेऊनही दुचाकी मिळाली नसल्याने त्यांनी अखेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. नांदुरा येथील वॉर्ड क्र. 1 मधील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा शासकीय कंत्राटदार अशोक बोडदे यांनी त्यांची हिरो होंडा कंपनीची (क्रमांक एमएच 28, झेड 9409) मोटारसायकल रेल्वे स्टेशनसमोर लावली होती. तिथून चोरांनी गायब केली. शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या असून, विविध चौकांत सीसीटीव्ही लावण्याची मागणी होत आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: