क्राईम डायरी

लग्‍नाच्‍या दीड महिन्यातच युवकाने घेतला गळफास

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लग्‍नाच्‍या अवघ्या दीड महिन्यातच 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना टुनकी (ता. संग्रामपूर) शिवारात 8 जूनच्‍या सायंकाळी 6 च्‍या सुमारास घडली.

प्रवीण मारोती कोष्टी (22, रा. टुनकी) असे आत्‍महत्‍या केलेल्याचे नाव आहे. विजय जैस्वाल यांच्‍या शेताच्‍या धुऱ्यावरील लिंबाच्‍या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्‍णालयात पाठवला.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: